Photo : x (@INCIndia) 
राष्ट्रीय

मत चोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार; मोदींना चेहरा लपविण्यासाठीही जागा मिळणार नाही; राहुल गांधींचा मोठा इशारा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या 'मतदार हक्क' यात्रेच्या समारोपाच्या रॅलीतून भाजपवर सोमवारी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.

Swapnil S

पाटणा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या 'मतदार हक्क' यात्रेच्या समारोपाच्या रॅलीतून भाजपवर सोमवारी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. जेव्हा आम्ही महादेवपुरा येथे मत चोरीचे सत्य उघड केले, तेव्हा आम्ही अणुबॉम्ब टाकला. पण, आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे. हायड्रोजन बॉम्बनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला चेहरा लपविण्यासाठीही जागा मिळणार नाही, असा दावाही गांधी यांनी केला.

आता आपण भाजपाला सांगतो की, तुम्ही अणुबॉम्बचे नाव ऐकले असेल. मात्र, अणुबॉम्बपेक्षा हायड्रोजन बॉम्ब असतो. महादेवपुरामध्ये आम्ही अणुबॉम्ब दाखवला. मात्र, आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे. मत चोरीची जी सत्यता आहे ती आता संपूर्ण देशाला समजणार आहे.

२४ तासांत आंदोलकांना हटवा! मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगे यांना अल्टिमेटम; आझाद मैदानात फक्त पाच हजार आंदोलकांना परवानगी

सुहाना खानच्या अडचणी वाढणार? शेतजमीन खरेदीवर वाद; अटींचा भंग केल्याचा आरोप; महसूल विभागाकडून चौकशी सुरू

Maratha Reservation : आंदोलनाला ‘खेळकर’ रंग; आंदोलकांचे मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो-खो

पुण्याहून आझाद मैदानाकडे निघालेल्या मराठा बांधवांवर पनवेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला; ५ जण जखमी, दोघांना अटक

इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली