रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ २० जानेवारीपासून  
राष्ट्रीय

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ २० जानेवारीपासून

ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा, हुगळी, पूर्व वर्धमान, मुर्शिदाबाद, माल्दा, जलपाईगुडी व कूचबिहार आणि आसाममधील कामरूप महानगर व बोंगाईगाव या नऊ जिल्ह्यांमधून धावेल.

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील पहिल्या ‘वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस ट्रेन’ला पंतप्रधान नरेंद्र मोदी २० जानेवारीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. ही ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणार आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा, हुगळी, पूर्व वर्धमान, मुर्शिदाबाद, माल्दा, जलपाईगुडी व कूचबिहार आणि आसाममधील कामरूप महानगर व बोंगाईगाव या नऊ जिल्ह्यांमधून धावेल. या मार्गावर एकूण १० थांबे आहेत आणि ही ट्रेन रात्रीच्या वेळी धावेल.

पुढील सहा महिन्यांत आठ नवीन ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरू केल्या जाणार आहेत आणि वर्षाच्या अखेरीस ही संख्या १२ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. कोलकाता-गुवाहाटी ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’मध्ये १६ कोच असतील. यामध्ये १३ एसी थ्री-टियर, चार एसी टू-टियर आणि एक एसी फर्स्ट-क्लास कोच असेल. या ट्रेनमध्ये एका वेळी एकूण ८२३ प्रवासी प्रवास करू शकतील. यामध्ये एसी थ्री-टियरमध्ये ६११, एसी टू-टियरमध्ये १८८ आणि एसी फर्स्ट-क्लासमध्ये २४ प्रवाशांची क्षमता आहे. ही ट्रेन १८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव या सेवेसाठी ती फक्त १३० किमी प्रतितास वेगाने धावेल.

आसामी-बंगाली जेवण

कोलकाता-गुवाहाटी मार्गावरील ‘स्लीपर वंदे भारत ट्रेन’च्या तिकिटांचे दर २,३०० रुपयांपासून सुरू होतील. कोलकाता ते गुवाहाटीदरम्यान एसी ३-टियरचे भाडे २,३०० रुपये, एसी २-टियरचे भाडे ३,००० रुपये आणि एसी १-टियरचे भाडे ३,६०० रुपये असेल. आम्हाला या ट्रेनच्या तिकिटांचे दर विमान प्रवासापेक्षा खूप कमी ठेवायचे होते. म्हणूनच तिकिटांचे दर ३-टियरसाठी २,३०० रुपये, २-टियरसाठी ३,००० रुपये आणि १-टियरसाठी ३,६०० रुपये ठेवण्यात आले आहेत. गुवाहाटीहून धावणाऱ्या ट्रेनमध्ये आसामी जेवण, तर कोलकाताहून धावणाऱ्या ट्रेनमध्ये बंगाली जेवण मिळेल.

दोन ट्रेन तयार

‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ ही भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी आणि रात्रीच्या प्रवासासाठी डिझाइन केलेली पूर्णपणे वातानुकूलित ट्रेन आहे. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दोन ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ तयार आहेत आणि त्यांची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल; "ज्यांनी-ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांच्यासोबतच...

MMRC चा मोठा निर्णय; सोमवारपासून Aqua Line मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा

'बाई.. हा काय प्रकार?' कच्च्या आल्यावर सॉस अन् चहात केळी; लोकलमधील व्लॉगरच्या अजब खाद्यप्रयोगाने प्रवासी अवाक | Video

MMS वादानंतर पायल गेमिंगचा अध्यात्मिक नववर्षारंभ; सिद्धिविनायक दर्शनाने केली २०२६ ची सुरुवात

वयाच्या पन्नाशीतही इतकी एनर्जेटिक? मलायका अरोराचा 'हा' मॉर्निंग हेल्थ शॉट आहे यामागचं गुपित!