(Photo-X/@ANI)
राष्ट्रीय

राजस्थानमध्ये कारखान्यातील स्फोटात ७ जणांचा मृत्यू

राजस्थानच्या खैरथल जिल्ह्यातील खुसखेडा औद्योगिक क्षेत्रात सोमवारी सकाळी एका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे आग लागली. या आगीच्या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला.

Swapnil S

खैरथल : राजस्थानच्या खैरथल जिल्ह्यातील खुसखेडा औद्योगिक क्षेत्रात सोमवारी सकाळी एका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे आग लागली. या आगीच्या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण औद्योगिक परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बंद असलेल्या कारखान्याला आग लागल्याचे सुरुवातीला म्हटले जात होते. मात्र, जेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी आत प्रवेश केला, तेव्हा सात जण जिवंत जळाल्याच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. माहिती मिळताच भिवाडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तसेच अग्निशमन दलाकडून मोठ्या प्रमाणात ​रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.

कारखाना होता बंद

मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक जी-१,११८ वर असलेला हा कारखाना अनेक महिन्यांपासून बंद होता. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, कारखान्यातून अचानक दाट, काळा धूर येऊ लागला. काही सेकंदातच आगीने संपूर्ण कारखान्याच्या इमारतीला वेढले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आगीदरम्यान तीन ते चार स्फोट झाले.

दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की, इतर काही संशयास्पद हालचालींमुळे लागली, याचा तपास भिवाडी पोलीस करत आहेत. प्रशासनाने आता इतर औद्योगिक युनिट्सना त्यांच्या सुरक्षा मानकांचा तत्काळ आढावा घेण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. कारखान्यात पुठ्ठ्याचा मोठा साठा असल्यामुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणणे कठीण झाले. यानंतर अथक परिश्रमानंतर कारखान्यातील आग आटोक्यात आणण्यात आली.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल