पाटणा : एक कोटी युवकांना रोजगार, एक कोटी ‘लखपती दीदी’ घडविणे, चार शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा आणि राज्यात सात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणे, केजी ते पीजी मोफत शिक्षण आदी आश्वासने राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) आपल्या संकल्पपत्रात दिली आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, जीतनराम मांझी, चिराग पासवान आणि इतर आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला.
सात एक्स्प्रेस-वे, १० औद्योगिक उद्याने, केजी ते पीजीपर्यंत मोफत दर्जेदार शिक्षण आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती/जमाती विद्यार्थ्यांना दरमहा २ हजार रुपयांची मदत आदी बाबी या ६९ पानी जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत.