राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या CBI चौकशीची मागणी; सरकारने बैठक रोखली, संत-महंत संतप्त संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या CBI चौकशीची मागणी; सरकारने बैठक रोखली, संत-महंत संतप्त

अयोध्या येथील राम मंदिर निर्माण देणगीच्या अपहार प्रकरणावरून वातावरण तापले आहे.

Swapnil S

अयोध्या : अयोध्या येथील राम मंदिर निर्माण देणगीच्या अपहार प्रकरणावरून वातावरण तापले आहे. या घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी साधू-संतांनी आयोजित केलेली बैठक स्थानिक प्रशासनाने रोखल्याचा आरोप संतांनी केला आहे. या कारवाईमुळे संत समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत सीबीआय चौकशी न झाल्यास भव्य जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “आम्हाला मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करायचे होते, परंतु प्रशासनाने आम्हाला रोखले. आम्ही आधीच स्पष्ट केले होते की हा कोणताही मोर्चा किंवा आंदोलन नाही. हीच तत्परता जर देणगी चोरांना पकडण्यासाठी दाखवली असती, तर आज संतांना रस्त्यावर उतरावे लागले नसते. एवढी मोठी रक्कम लंपास झाली आणि प्रशासनाला काहीच माहिती नाही? प्रशासन झोपले होते का? आम्ही शांततेत बैठक बोलावली होती, पण दरवाजे बंद करण्यात आले. योगी जी हे आपल्यातीलच एक संत आहेत, मात्र हे स्थानिक प्रशासनाचे संपूर्ण अपयश आणि निष्काळजीपणा आहे."

पुढे बोलताना ते म्हणाले, "आम्हाला या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी हवी आहे, अन्यथा आम्ही देशव्यापी जनआंदोलन छेडू. दिल्लीतील आंदोलनादरम्यान आमचे ऐकून घेण्यात आले आणि निवेदन स्वीकारले गेले. परंतु, येथे आम्हाला रोखले जात आहे; कारण सत्य समोर आले तर प्रशासनातील अनेक अधिकारी अडचणीत येतील.

चंपत राय परतल्यास सरकार कोसळेल

महामंडलेश्वर प्रकाशानंद गिरी यांनी याप्रकरणी अयोध्या प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. देणगी अपहाराचे आरोप समोर आल्यानंतर महिन्याभरापूर्वी ट्रस्टच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे चंपत राय यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. चंपत राय पुन्हा परतले, तर सरकार कोसळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका; मुंबईत आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आंदोलनाला मनाई, फक्त १ दिवसाची परवानगी

नौदलाची पाणबुडी बचाव क्षमता आणखी वाढणार; भारतीय नौदलात ‘निपुण’ युद्धनौका ३१ ऑगस्टला होणार दाखल

टिटवाळा स्थानकात १५ रात्रींचा पॉवर ब्लॉक; प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी लोकल प्रवाशांचे हाल

उत्तर प्रदेश, बिहार निवडणुकांवर डोळा ठेवून आंदोलन - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Mumbai : रिक्षा-टॅक्सी चालकांकडून मराठी सक्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान