@ANI
राष्ट्रीय

Repo Rate : सलग सहाव्यांदा वाढला रेपो रेट; गृहकर्जही महागणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) आपले पतधोरण जाहीर केले असून रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केली आहे

प्रतिनिधी

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) नुकतेच आपले पतधोरण जाहीर केले. यानुसार रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ करण्यात आली. आधी ६.२५ टक्के असलेल्या रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट ६.५० टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे आता गृहकर्जामध्येही वाढ होणार असून याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

देशातील महागाई दर कमी होत असला तरी सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढतो आहे. गेल्या वर्षी मे २०२२पासून आतापर्यंत रेपो रेट सलग सहा वेळा वाढला आहे. या कालावधीत तो एकूण २.५०ने वाढला. या वाढीमुळे सर्व प्रकारची गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज महाग झाले. यामुळे कर्जदारांना जास्त ईएमआय भरावे लागणार आहेत. यावेळी गव्हर्नर दास यांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांमध्ये जागतीक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामानुसार जगभरातील मध्यवर्ती बँकांना व्याजदार वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. महागाईवर नियंत्रणासाठी हे कठीण निर्णय घेणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प