रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पीटीआय (व्हिडिओ)
राष्ट्रीय

RBI चा सर्वसामान्यांना दिलासा; रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात; EMI चा भार होणार कमी

रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व कर्जदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या EMI मध्ये घट...

Krantee V. Kale

रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व कर्जदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आला असून तो ५.५% वरून ५.२५% इतका झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या EMI मध्ये घट होण्याची शक्यता आहे.

हा निर्णय आरबीआयच्या तीन दिवस चाललेल्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर शुक्रवारी जाहीर करण्यात आला. बैठक पूर्ण झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नवीन व्याजदर जाहीर केले.

एमपीसीची अखेरची बैठक १ ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.५% वर स्थिर ठेवला होता. यावेळी एमपीसी सदस्यांनी एकमताने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने निचांकी पातळी गाठलेली असताना आरबीआयच्या या निर्यणाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

आरबीआयचे इतर प्रमुख दर - काय बदललं, काय कायम?

  • CRR: ३%

  • SDF: ५.२५%

  • MSF: ५.७५%

  • Bank Rate: ५.७५%

हे सर्व दर पूर्ववत ठेवण्यात आले आहेत.

महागाई आणि वाढ - आरबीआयचा आढावा

महागाईच्या प्रोजेक्शनमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

  • किरकोळ महागाई (CPI) : २०२५–२६ साठी थेट २% वर

  • २०२६–२७ च्या पहिल्या तिमाहीत: ३.९% (मागील अंदाज ४.५% पेक्षा कमी)

महागाईच्या एकूण जोखमी ‘संतुलित’ असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.

दुसरीकडे, वाढीच्या प्रोजेक्शनमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे:

  • वार्षिक जीडीपी प्रोजेक्शन: ६.८% वरून ७.३%

  • चालू तिमाही (Q3) प्रोजेक्शन: ६.४% वरून ६.७%

अखेर गुन्हे मागे! CJP आंदोलकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ५ सप्टेंबरचा मोर्चा स्थगित

अतिक्रमणांवर हातोडा! मस्जिद बंदरच्या नंदलाल जानी मार्गावरील दुकाने, सिमेंट ओटे जमीनदोस्त; BMC च्या ‘बी’ वार्डाची तोडक कारवाई

Nepal Floods : नेपाळमधील मृतांचा आकडा एक हजारावर; जवळपास ४ हजार जण अद्याप बेपत्ता

OBC बैठकीतून तीन मंत्र्यांचा सभात्याग; भुजबळ, पाटील, राठोड आक्रमक

एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्राप्रकरणी तडजोडीला स्थगिती