राष्ट्रीय

RBI Repo Rate Hike : आता कर्जाचे हप्ते महागणार; रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ३५ पॉइंटची वाढ

आरबीआयने रेपो दराची घोषणा केली (RBI Repo Rate Hike) असून व्याज दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा एकदा सामान्यांचे कर्जाचे हप्ते महागणार आहेत.

प्रतिनिधी

आज तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ३५ पॉइंटची (Repo Rate) वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर आता रेपो दर आता ६.२५ टक्के एवढा झाला आहे. आधी तो ५.९ टक्क्यांवर होता. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता सामान्य लोकांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय एमपीसीची बैठक सोमवारी झाली.

गेल्या आठ महिन्यांमध्ये अंदाजे २.२५ टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ झाली. याचा अप्रत्यक्ष परिणाम गृहकर्ज आणि बँकांकडून इतर गोष्टींसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांवरही होऊ शकतो. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाला आरबीआय संबंधित बोर्डाच्या सहापैकी पाच सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. कोविडमध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ न करत आहे तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मे, २०२२मध्ये आरबीआयने ४० पॉइंटची वाढ केली. त्यानंतर सलग तीन महिन्यात वेळा प्रत्येकी ५० पॉइंटची वाढ करण्यात आली.

BMC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर ; एकूण ९४ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात, वाचा सर्व उमेदवारांची नावे

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

आधी लाथा-बुक्क्या, आता जादू की झप्पी; व्हायरल झालेल्या 'त्या' डॉक्टर आणि पेशंटचं भांडण मिटलं, नेमकं प्रकरण काय?

'मला सतत मेसेज करायचा'...; सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक दावा करणारी खुशी मुखर्जी कोण?

चीनचा तीळपापड! 'इतिहास बदलू शकत नाही'; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चा ट्रेलर बघून तीव्र प्रतिक्रिया