राष्ट्रीय

आरबीआयने व्याजदर घटवावेत! केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास यांच्यासमोर मागणी

दोन दिवसांपूर्वी देशातील महागाईचे आकडे समोर आल्यानंतर व्याजदर कपातीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता व्याजदर कपातीच्या विषयात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी उडी घेतली आहे. आरबीआयने व्याजदरात कपात करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यासमोरच केली.

Swapnil S

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी देशातील महागाईचे आकडे समोर आल्यानंतर व्याजदर कपातीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता व्याजदर कपातीच्या विषयात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी उडी घेतली आहे. आरबीआयने व्याजदरात कपात करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यासमोरच केली.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना गोयल म्हणाले की, व्याजदरांबाबत निर्णय घेताना अन्नधान्याच्या महागाईचा विचार करणारा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे आरबीआयने व्याजदरात कपात केली पाहिजे. मात्र, हे माझे वैयक्तिक विचार आहेत. हे सरकारचे विचार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात केलेल्या सूचनेनुसार, पतधोरणाच्या आराखड्यात महागाईचा दर ठरवताना त्यात अन्नधान्याच्या महागाईचा विचार करू नका. कारण खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या किमती मागणीपेक्षा पुरवठ्यामुळे ठरत असतात. येत्या डिसेंबरपर्यंत महागाई आटोक्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ऑक्टोबरच्या शेवटच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय - उद्धव ठाकरे