PTI
राष्ट्रीय

Reliance Jio वापरकर्त्यांना झटका! पोस्टपेड, प्रीपेड प्लॅन्समध्ये १२ ते २७ टक्के वाढ

देशातील मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने येत्या ३ जुलैपासून पोस्टपेड, प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने येत्या ३ जुलैपासून पोस्टपेड, प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने १२ ते २७ टक्के वाढ जाहीर केली आहे. अडीच वर्षांनंतर ही दरवाढ करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीचा सर्वात छोटा रिचार्ज १५ वरून १९ रुपये (१ जीबी), ७५ जीबी पोस्टपेड प्लॅन ३९९ वरून ४४९ रुपये, ६६६ रुपयांचा अमर्यादित प्लॅन (८४ दिवस) ७९९ रुपये करण्यात आला आहे, तर वार्षिक रिचार्ज १,५५९, १,८९९ रुपयांवरून २,९९९ ते ३,५९९ रुपये झाले आहेत. या प्लॅनमध्ये ‘५ जी’ डेटा रोज २ जीबी मिळत आहे.

जिओचा सर्वात स्वस्त १५५ रुपयांचा प्लॅन १८९ रुपये, २०९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २४९ रुपये, २३९ रुपयांचा प्लॅन २९९ रुपये झाला आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव