राष्ट्रीय

Richa Chadha controversy : अभिनेत्री रिचा चढ्ढा का ठरतेय 'देशद्रोही'? नेमके प्रकरण काय?

प्रतिनिधी

हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा ही नेहमी आपल्या राजकीय, सामाजिक मते सोशल माध्यमांवर मांडत असते. तिच्या या बोल्ड स्वभावामुळे अनेकवेळा चर्चेतदेखील आली आहे. मात्र, यावेळी तिच्या एका ट्विटने संपूर्ण देशात खळबळ माजली. आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी आदेश लागू करण्याचे विधान केले होते. शासनाने सांगितल्यास लष्कर पीओके परत घेण्यास तयार असून केवळ शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, असे म्हंटले होते. यावर तिने रिट्विट करत, 'गलवान म्हणतोय हाय' असे म्हंटले आणि देशभरातून तिच्यावर टीका करण्यात आली.

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, " हे ट्विट अपमानजनक आहे. ते लवकर मागे घ्यायला हवे. आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करणे बरोबर नाही.' असे म्हणत रिचाला धारेवर धरले. त्यांनी अभिनेत्रीला काँग्रेस आणि राहुल गांधींची पुजारी म्हणत तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील केली. निर्माते अशोक पंडित यांनी म्हंटले की, "सैनिकांची मस्करी करणाऱ्यांना हा देश कधीच माफ करणार नाही,"

देशभरातून टीका झाल्यानंतर तिच्याने माफी मागत म्हंटले की, "माझा हेतू हा कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता. माझ्या या ३ शब्दांमुळे मला वादात ओढले गेले आहे. जर माझ्या शब्दांमुळे जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे माझ्या सैनिक बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते. एवढेच नव्हे तर मला हेही सांगायचे आहे की, माझे आजोबा, मामाही सैन्यात होते. देशभक्ती ही माझ्या रक्तात आहे. देशासाठी लढताना मुलगा शहीद झाला की कुटुंबावर वाईट परिणाम होतो. सैनिक जखमी झाल्यास त्याचा काय परिणाम होतो हे मला चांगले माहीत आहे. हा माझ्यासाठी भावनिक मुद्दा आहे."

४ जूनला ठरणार खरी शिवसेना कोणाची? मतदारराजाचा कौल निर्णायक; मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना आमनेसामने

कोस्टल रोड १६ तास सुरू राहणार; चाचणीनंतर वेळापत्रक होणार कायम

सुप्रियांची पुण्याईवर तर सुनेत्रांची 'बारामती मॉडेल'वर भिस्त; काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला!

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : आरोपी थापनची कोठडीत आत्महत्या; जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

मेमध्येही उष्णतेच्या लाटांचा तडाखा; सरासरीपेक्षा अधिक तापमान वाढीचा हवामान खात्याचा इशारा