राष्ट्रीय

वाढत्या प्रदूषणामुळे मधुमेहाचा धोका! ‘लॅन्सेट’च्या संशोधनात धक्कादायक बाब उघड

भारतासह जगभरात प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. प्रदूषणामुळे मानवी जीवनाला मोठा धोका निर्माण होत आहे. दमा, ॲॅलर्जी आदी आजार प्रदूषणामुळे होतात. आता त्यात ‘मधुमेह टाईप-२’चा समावेश झाला आहे, अशी धक्कादायक माहिती...

Swapnil S

नवी दिल्ली : भारतासह जगभरात प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. प्रदूषणामुळे मानवी जीवनाला मोठा धोका निर्माण होत आहे. दमा, ॲॅलर्जी आदी आजार प्रदूषणामुळे होतात. आता त्यात ‘मधुमेह टाईप-२’चा समावेश झाला आहे, अशी धक्कादायक माहिती ‘लॅन्सेट’च्या संशोधनातून उघड झाली आहे.

२.५ पीएम हवेत जास्त काळ राहिल्यास ‘टाईप-२’ मधुमेहाचा धोका अधिक संभवतो. वातावरणातील धुलीकण केसांच्या ३० पट अधिक पातळ असतात.

‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाने याबाबत अधिक संशोधन केले असून, ‘टाईप-२’ मधुमेह होणारे २० टक्के रुग्ण हे २.५ पीएम प्रदूषणात राहत असल्याचे दिसून आले. तेल, डिझेल, बायोमास, पेट्रोल आदी जाळल्याने हे सूक्ष्म प्रदूषक उत्सर्जित केले जातात.

भारतात प्रदूषण वाढत असून देशातील मोठी लोकसंख्या प्रदूषणकारी हवेच्या संपर्कात आहे. पीएम २.५ प्रदूषक हे जीवाला हानीकारक असतात. शहरी क्षेत्रातील प्रदूषणातील हा मुख्य घटक आहे. एखादी व्यक्ती ‘पीएम २.५’ हवेच्या संपर्कात आल्यास मज्जातंतूवर परिणाम होतो. त्यातून इन्सुलिनचे संतुलन बिघडून ह्रदयरोगाचा धोकाही वाढतो.

पीएम २.५ प्रदूषणकारी हवेत महिनाभर राहिल्यास रक्तातील साखर वाढते. तर या हवेत वर्षभर राहिल्यास ‘टाईप-२’ मधुमेहाचा धोका २० टक्क्याने वाढतो. हवेतील प्रदूषण व मधुमेहातील संबंध हा कनिष्ठ वर्गातील सामाजिक-आर्थिक समुहातील पुरुषांमध्ये अधिक जाणवतो. २.५ पीएम मधुमेहग्रस्ताला किंवा मधुमेह नसलेल्या व्यक्तीला मूत्रपिंडाचेही आजार होऊ शकतात.

५३७ दशलक्ष जणांना ‘टाईप-२’चा मधुमेह आहे. मात्र, त्यातील अर्ध्या लोकांना आपल्याला मधुमेह आहे, हेच माहिती नसते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, १८ वर्षांवरील ७७ दशलक्ष लोकांना मधुमेह (टाईप-२) आहे. तर २५ दशलक्ष लोकांना भविष्यात मधुमेह होण्याचा धोका आहे.

भारतीय शहरे प्रदूषित

जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार, बिहारचे बेगुसराय हे जगातील सर्वात मोठे प्रदूषणकारी शहर तर दिल्ली ही सर्वात जास्त प्रदूषण असलेली राजधानी आहे. २०१८ नंतर चार वेळा जगातील सर्वात प्रदूषणकारी राजधानी म्हणून दिल्लीचा समावेश झाला आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत