संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून रॉबर्ट वड्रा यांच्यावर आरोपपत्र दाखल

अंमलबजावणी संचालनालयाने इंग्लंडस्थित शस्त्र सल्लागार संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात उद्योजक रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने इंग्लंडस्थित शस्त्र सल्लागार संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात उद्योजक रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हे पुरवणी आरोपपत्र विशेष मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

वड्रा यांच्याविरुद्ध दाखल झालेले हे दुसरे मनी लाँड्रिंग आरोपपत्र आहे. यापूर्वी यंदा जुलैमध्ये हरयाणातील शिकोहपूर जमीन व्यवहारातील कथित गैरव्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातही ईडीने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.

भंडारी यांची प्रत्यार्पणाची विनंती इंग्लंड येथील न्यायालयाने फेटाळल्यानंतर, जुलैमध्ये दिल्ली न्यायालयाने त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते.

मालेगावात जनआक्रोश! चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले; न्यायालयासमोर ठिय्या आंदोलन

मीरा-भाईंदरकरांसाठी 'गुड न्यूज'! दहिसर-काशिमीरा मेट्रो 'या' महिन्यापासून सेवेत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा

कांदिवली गोळीबार प्रकरण: बिल्डरवर गोळ्या झाडणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक; CCTV फुटेज समोर, ३ हल्लेखोरांचा शोध सुरू

उल्हासनगर राज्यातील राजकारणाचे नवे ‘हॉटस्पॉट’; भाजप-शिंदे संघर्षाची सुरुवात उल्हासनगरातूनच - फडणवीस

Mumbai : मुंबईकरांना दिलासा! ‘क्लस्टर’अंतर्गत नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय