दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोलाला भारतात आणले 
राष्ट्रीय

दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोलाला भारतात आणले

दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आणि अमली पदार्थ माफिया सलीम डोला याला मंगळवारी पहाटे एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले.

Swapnil S

मुंबई : दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आणि अमली पदार्थ माफिया सलीम डोला याला मंगळवारी पहाटे एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवली गेली होती.

सध्या विमानतळावर गुप्तचर विभागाचे अधिकारी त्याची चौकशी करत असून, प्राथमिक चौकशीनंतर त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले जाण्याची शक्यता आहे.

'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'ने त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते आणि इंटरपोलने त्याच्याविरुद्ध 'रेड कॉर्नर नोटीस' देखील बजावली होती. अलिकडेच त्याला तुर्कीत अटक करण्यात आली होती व त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी कारवाई पूर्ण करण्यात आली.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२