संजुक्ता पराशर बनल्या ‘कोब्रा’ दलाच्या IG; कमांडो दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी (Photo-X)
राष्ट्रीय

संजुक्ता पराशर बनल्या ‘कोब्रा’ दलाच्या IG; कमांडो दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 'कोब्रा' या विशेष जंगल युद्धातील कमांडो युनिटच्या पोलीस महानिरीक्षकपदी (आयजी) आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 'कोब्रा' या विशेष जंगल युद्धातील कमांडो युनिटच्या पोलीस महानिरीक्षकपदी (आयजी) आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विशेष कमांडो दलाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. संजुक्ता पराशर या २००६ च्या तुकडीतील आसाम-मेघालय कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. सीआरपीएफ मुख्यालयाने गेल्या आठवड्यात या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. पराशर या १९९६ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी दानेश राणा यांच्याकडून कोब्रा दलाच्या आयजी पदाची सूत्रे स्वीकारतील.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १० बटालियनचे संख्याबळ असलेल्या सीआरपीएफच्या कोब्रा दलाची धुरा एका महिला अधिकाऱ्याकडे सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. संजुक्ता पराशर यांनी यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेत सेवा बजावली असून, आपल्या मूळ आसाम कॅडरमध्येही विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

कोब्रा दलाची पार्श्वभूमी

देशातील विविध राज्यांमधील डाव्या विखारी विचारसरणीच्या हिंसेचा सामना करण्यासाठी आणि ईशान्येकडील राज्यांमधील बंडखोरी रोखण्यासाठी सीआरपीएफने २००८-०९ मध्ये 'कोब्रा' दलाची स्थापना केली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI पेमेंटला शुल्क लागू; २००० रु.हून अधिक - ०.४ टक्के शुल्क, २००० पर्यंत - मोफत

शिवसेना फूटप्रकरणी घटनेचे उल्लंघन नाही; एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा दावा

दिघीमध्ये जहाजबांधणी; भारतातील सर्वात मोठा प्रकल्प रायगडमध्ये, माझगाव डॉकची २७ हजार कोटींची गुंतवणूक

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : गोरेगावात बेस्टच्या बसचा अपघात; २ जण जखमी, Video