राष्ट्रीय

ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के; सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक धक्का

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ठाकरे गटाला सांगितले, 'उद्या या'

प्रतिनिधी

शिवसेना ठाकरे गट चांगलाच अडचणींमध्ये सापडला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह शिंदे गटाच्या नावावर केले. यानंतर आता शिंदे गटाने शिवसेना कार्यालयांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या सर्व घटनेनंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयाने त्यांना उद्या येण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर त्यांनी या निर्णयाला आव्हान देण्याचे ठरवले. उद्धव ठाकरे गटाचे वकिल सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत उद्या येण्याचे निर्देश दिले. ठाकरे गटाने ही याचिका आज न्यायालयात मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने उद्या रीतसर मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत यायला सांगितले. त्यामुळे आता उद्या सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

इराणमध्ये नोकरी शोधताय? तर, सावधान! भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा