राष्ट्रीय

सीमा हैदरचा राग हिंदू मंदिरांवर ; पाकिस्तानी माथेफिरुंचा मंदिरावर हल्ला, तोडफोड करत केला अंधाधुंद गोळीबार

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील डाकूंनी हिंदू प्रार्थनास्थलांवर आणि हिंदू समुदायावर हल्ला करण्याची धमकी दिली होती

नवशक्ती Web Desk

पाकिस्तानी सीमा हैदरने भारतात आश्रय घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये हिंदू आणि हिंदू धर्मीयांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये एका टोळीने हिंदू मंदीरांवर हल्ला करत अंदाधुंद गोळीबार केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका टोळीनं हिंदू मंदिरावर रॉकेट लॉंचरने हल्ला केला. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील डाकूंनी हिंदू प्रार्थनास्थलांवर आणि हिंदू समुदायावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

१६ जुलै रोजी पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतात दरोडेखोरांच्या एका टोळीने हिंदू मंदिरावर रॉकेट लॉंचरने हल्ला केला. एका पोलीस अधिकाऱ्यांने यासंबंधित माहिती दिली आहे. यावेळी हल्लेखोरांनी हिंदू समुदायाच्या सदस्यांच्या घरांवर देखील हल्ला केला. याबागात गोळीबार देखील करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सीमा हैदरने भारतात येऊन हिंदू धर्म स्वीकारत हिंदू तरुणाशी लग्न केल्यामुळे हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या ४८ तासांमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला करुन तोडफोड केल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी शुक्रवारी रात्री कराचीमध्ये १५० वर्ष जुने हिंदू मंदिर पाडण्यात आलं होतं. तर मारी मारी माता मंदिरावर बुलडोझर चालवण्यात आल्याचं स्थानिकांनी सांगितलं होतं.

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती