राष्ट्रीय

सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्राचा पीएमआय घसरुन ५४.३

वृत्तसंस्था

देशातील सेवा क्षेत्रातील व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येते. महागाईच्या दबावामुळे सप्टेंबर महिन्यात घसरुन तो गेल्या सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. एका मासिक सर्वेक्षणात म्हटले आहे की, या क्षेत्रात मार्चपासून चलनवाढीचा दबाव आणि स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये व्यसाय मंदावत असल्याचे दिसून आला आहे.

हंगामी समायोजित एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स सप्टेंबरमध्ये ५४.३वर घसरला, जो ऑगस्टमध्ये ५७.२ होता. मार्चनंतरचा हा सर्वात कमी वाढीचा दर आहे. सेवा क्षेत्रामध्ये सलग चौदाव्या महिन्यात उत्पादनात वाढ झाली आहे. पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) भाषेत, ५० वरील आकृती विस्तार दर्शवते, तर ५०पेक्षा कमी आकृती आकुंचन दर्शवते.

एस ॲण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्राच्या सहयोगी संचालक पॉलियाना डी लिमा यांनी सांगितले की, भारतीय सेवा क्षेत्राने अलीकडच्या काही महिन्यांत अनेक संकटांवर मात केली आहे. नवीनतम पीएमआय डेटा वाढीमध्ये सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात घसरणअसली तरी ही कामगिरी चांगली आहे. महागाईचा दबाव, तीव्र स्पर्धात्मक वातावरण आणि प्रतिकूल सार्वजनिक धोरणांमुळे वाढीला अडथळा निर्माण झाला आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

लिमा पुढे म्हणाल्या की, अमेरिकेतील व्याजदर वाढीमुळे महिन्याच्या अखेरीस रुपयाच्या तीव्र घसरणीने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अतिरिक्त आव्हान उभे केले आहे. तथापि, सप्टेंबरमध्ये रोजगार आघाडीवरील क्षमतेचा दबाव कमी झाला. प्रलंबित वर्कलोड आणि विक्रीतील सतत वाढ यामुळे रोजगार निर्मितीच्या आणखी एका फेरीला मदत झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत रोजगार कमी वेगाने वाढला. एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया कंपोझिट पीएमआय आउटपुट इंडेक्स ऑगस्टमधील ५८.२ वरून सप्टेंबरमध्ये ५५.१ वर घसरला. मार्चनंतरची ही सर्वात कमकुवत वाढ ठरली आहे.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

CBSE Results 2024 : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर; बघा डिटेल्स

"अनेक वर्ष मतदान करते तिथेच माझं नाव नाही.." गायिका सावनी मतदानाला मुकली

"मला मतदान करु दिले नाही, कारण..."; अभिनेता सुयश टिळकने व्यक्त केली खंत; सोशल मीडियावर झाला व्यक्त

मुंबई ते विदर्भ अजून सुसाट! समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार; 'या' तीन जिल्ह्यांना फायदा