राष्ट्रीय

सीबीआयमध्ये सात नवीन डीआयजी

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांची फेडरल प्रोब एजन्सीमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय गुप्तचर विभागात (सीबीआय) गुरुवारी उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सात अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुमेधा आणि गगनदीप सिंगला यांचा समावेश आहे. यातील हिमाचल प्रदेश केडरच्या २००५ बॅचच्या भारतीय पोलीस सेवा अधिकारी सुमेधा यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

अन्य अधिकाऱ्यांमध्ये राजस्थान केडरचे २०१० बॅचचे आयपीएस अधिकारी सिंगला यांना १२ जानेवारी २०२४ ते ११ जानेवारी २०२९ पर्यंत पाच वर्षांसाठी डीआयजी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असेही एका आदेशात म्हटले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांची फेडरल प्रोब एजन्सीमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याशिवाय, पाच आयपीएस अधिकारी - के. शिव सुब्रमणी, धुरत सायली सावळाराम, पी. मुरुगन, राजवीर आणि जलसिंग मीना हे आधीच सीबीआयमध्ये अधीक्षक म्हणून काम करत आहेत, त्यांना आता वेगवेगळ्या एकत्रित कार्यकाळासाठी डीआयजी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

GST त दिलासा; १२ टक्क्यांचा स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल