राष्ट्रीय

मोदी हे भारताची अनमोल संपत्ती - थरूर

जागतिक मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताची अनमोल संपत्ती आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केले. पंतप्रधान मोदी यांची ऊर्जा, वेगवान काम करण्याची पद्धत व दुसऱ्या देशांशी संबंध जोडण्याची इच्छा आदी पाहता त्यांना अधिक सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेस नेते थरूर यांनी गेल्या महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अमेरिका, ब्राझील व अन्य देशांचा दौरा केला होता.

Swapnil S

नवी दिल्ली : जागतिक मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताची अनमोल संपत्ती आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केले. पंतप्रधान मोदी यांची ऊर्जा, वेगवान काम करण्याची पद्धत व दुसऱ्या देशांशी संबंध जोडण्याची इच्छा आदी पाहता त्यांना अधिक सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेस नेते थरूर यांनी गेल्या महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अमेरिका, ब्राझील व अन्य देशांचा दौरा केला होता. एका वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात थरूर म्हणाले की, परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राष्ट्रीय संकल्प व प्रभावी संवाद आदींची संधी होती.

भारत जेव्हा एकजूट होतो तेव्हा स्पष्ट व दृढविश्वासाने आपला आवाज उठवू शकतो. आपल्या शिष्टमंडळांनी जगाला पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या अचूक लष्करी कारवाईची माहिती दिली. तसेच पाकिस्तानचे दहशतवादाच्या घनिष्ट संबंधांची माहिती दिली.

अमेरिकेत भारत व पाकिस्तानी शिष्टमंडळ पोहचले होते. तेथे पाकिस्तानी शिष्टमंडळही उपस्थित होते. तेव्हा अमेरिकन प्रतिनिधी आमची चिंता त्यांना सांगत होते आणि दहशतवादी गटाविरोधात निर्णायक कारवाईचे समर्थन करत होते. भारताची सातत्याने वकिली करून भारताची बाजू भक्कम करत होते, असे थरूर यांनी लिहिले आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’