संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

शीना बोराप्रकरणी सुप्रीम कोर्टाची ९ महिन्यांची मुदत

शीना बोराच्या हत्येला दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतर, या प्रकरणातील खटल्याला अधिक वेळ देण्यात आला आहे, परंतु यावेळी स्पष्ट अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला पूर्ण करण्यासाठी नऊ महिन्यांची अतिरिक्त मुदत दिली असून, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : शीना बोराच्या हत्येला दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतर, या प्रकरणातील खटल्याला अधिक वेळ देण्यात आला आहे, परंतु यावेळी स्पष्ट अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला पूर्ण करण्यासाठी नऊ महिन्यांची अतिरिक्त मुदत दिली असून, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे म्हटले आहे.

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अधिक वेळेची मागणी करणारे पत्र लिहिल्यानंतर, न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने १६ मार्च रोजी हा आदेश दिला. खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले की, 'केलेली विनंती लक्षात घेता, खटला निकाली काढण्यासाठी नऊ महिन्यांची मुदत वाढवून देण्यात येत आहे. मात्र, यापुढे वेळ वाढवून मिळण्यासाठी कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात येत आहे'.

इंद्राणी मुखर्जीला परदेश प्रवासासाठी दिलासा

न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला परदेश प्रवासाची परवानगी मागण्यासाठी नवीन अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली आहे. इंद्राणी सध्या जामिनावर बाहेर आहे. तिचे माजी पती पीटर मुखर्जी हे देखील या प्रकरणात सह-आरोपी आहेत.

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन