राष्ट्रीय

Delhi MCD : दिल्ली महापालिकेला मिळाला महापौर; आपच्या शैली ओबेरॉय विजयी

१५ वर्षांनंतर भाजपच्या (BJP) हातातून गेली दिल्ली महापालिका (Delhi MCD); आपच्या (AAP) शैली ओबेरॉय (Shelly Oberoi) यांनी भाजपच्या रेखा गुप्तांचा केला पराभव

प्रतिनिधी

अनेक दिवसांच्या गोंधळानंतर अखेर दिल्ली महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा पराभव केला. या निवडणुकीत एकूण २४१ नगरसेवकांनी मतदान केले. तर, काँग्रेसच्या ९ नगरसेवकांनी निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. दिल्लीत पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने महापौरपद मिळवले आहे. गेल्या १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र, आता आपच्या विजयानंतर नगरसेवकांनी मोठा जल्लोष केला.

शैली ओबेरॉय या दिल्लीतील पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक ८६मधील नगरसेविका आहेत. ३९ वर्षीय शैली ओबेरॉय या व्यवसायाने प्राध्यापक आहेत. दरम्यान, ४ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली महापालिकेच्या २५० जागांवर मतदान झाले होते. त्याचा निकाल ७ डिसेंबरला आला होता. यामध्ये आपने २५० पैकी १३४ जागा जिंकत बहुमत मिळवले होते. तर भाजपला १०४ जागांवर विजय मिळाला होता. याआधी ६ जानेवारी, २४ जानेवारी आणि ६ फेब्रुवारीला महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बैठका झाल्या, पण सभागृहात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोठा गोंधळ घातला होता. अखेर आज दिल्ली महापालिकेला आपला महापौर मिळाला.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत