राष्ट्रीय

झारखंडमध्ये एसयूव्ही झाडावर ;आदळल्याने सहा ठार

मृतांमध्ये सगीर अन्सारी, मोहम्मद युसूफ मिसा, इम्तियाझ अन्सारी, सुभान अन्सारी, याकूब अन्सारी आणि आफ्ताब अन्सारी यांचा समावेश आहे

नवशक्ती Web Desk

गिरिडीह : झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बाघमारा येथे एसयूव्हीने रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षाला दिलेल्या जोरदार धडकेमध्ये एसयूव्हीमधील सहाजण ठार झाले. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

या एसयूव्हीमधून प्रवास करणारे नऊ जण होते व ते विवाह समारंभाहून परत घरी जात होते. या अपघाताता पाच जण जागीच ठार झाले असून एकजण रुग्णालयात उपाचराच्यावेळी मरण पावला. अन्य जखमींमध्ये दोन मुले असून त्यांची पप्रकृती स्थिर असल्याची माहिती मुफासिल पोलीस ठाण्याचे अंमलदार कमलेश पासवान यांनी दिली.

मृतांमध्ये सगीर अन्सारी, मोहम्मद युसूफ मिसा, इम्तियाझ अन्सारी, सुभान अन्सारी, याकूब अन्सारी आणि आफ्ताब अन्सारी यांचा समावेश आहे. हे सर्व तिकोडीह येथे विवाह समारंभासाठी गेले होते ते थोरिया गावातील असून चालकाला पेंग आल्याने त्याचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

शेती बुडाली, डोळ्यात अश्रू! मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार; ८ जणांचा मृत्यू; शुक्रवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार

जनतेच्या पैशाचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला फटकारले

अकरावीच्या रिक्त जागांमध्ये दडलेय काय?

माझी मुंबई वाहतूक कोंडीत कावली!