राष्ट्रीय

जानेवारीअखेर काश्मीरात बर्फ पडणार

Swapnil S

श्रीनगर : हिवाळयात बर्फात खेळायला पर्यटक काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये जात असतात. यंदा हिवाळयात बर्फच न पडल्याने पर्यटकांनी काश्मीर, हिमाचल प्रदेशकडे पाठ फिरवली आहे. त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. अनेक पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले आहेत. मात्र, भारतीय हवामान खात्याने जानेवारी अखेरीस बर्फवृष्टी होईल, असा अंदाज व्यक्त केला.

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये पाऊस किंवा बर्फ पडला नाही. जम्मू-काश्मीरात डिसेंबरमध्ये ७९ टक्के पाऊस कमी झाला. अन्य राज्यात २४ जानेवारीपर्यंत ९९ टक्के पाऊस कमी झाला. यंदाच्या महिन्याखेर प. हिमालयाच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस व बर्फ पडणार आहे.

काश्मीरचे बुकिंग रद्द

हिवाळ्यात टूर कंपन्या व्यस्त असतात. पर्यटकांमुळे ते चांगली कमाई करतात. यंदा मोठ्या प्रमाणात बुकिंग रद्द झाले आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांचे शुटिंगही थांबवले आहे. स्कीईंग खेळणाऱ्या व्यक्तींची संख्याही कमी झाली आहे. पर्यटन महासंघाच्या सदस्याने सांगितले की, फेब्रुवारी व मार्चमध्ये गुलमर्ग व सोनमर्ग परिसरात चित्रीकरण होते. मात्र यंदा अजूनही बुकिंग मिळालेले नाही. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात निराशेचे वातावरण आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस