जंतरमंतरवर सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण; प्रशासनाने पाणी अन् शौचालय केले बंद; ‘कॉकरोच जनता पार्टी’चा आरोप X | abhijeet_dipke
राष्ट्रीय

जंतरमंतरवर सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण; प्रशासनाने पाणी अन् शौचालय केले बंद; ‘कॉकरोच जनता पार्टी’चा आरोप

स्पर्धा परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषण सुरू होताच दिल्ली पोलिसांनी या ठिकाणचे पाणी आणि स्वच्छता सुविधा शौचालय बंद केल्याचा आरोप ‘कॉकरोच जनता पार्टी’ने केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषण सुरू होताच दिल्ली पोलिसांनी या ठिकाणचे पाणी आणि स्वच्छता सुविधा शौचालय बंद केल्याचा आरोप ‘कॉकरोच जनता पार्टी’ने केला आहे.

‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी रविवारी ‘X’ वर पोस्ट करत प्रशासनावर निशाणा साधला. ‘सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू करताच दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील स्वच्छता सुविधा बंद केल्या आहेत.

तिथे ना पाण्याची सोय आहे, ना स्वच्छतेची. वांगचुक यांचे वय आणि प्रकृती पाहता पोलिसांनी सहकार्य करावे अशी विनंती आम्ही वारंवार केली, पण पोलीस ऐकत नाहीत. इतर मूलभूत सुविधाही बंद केल्या जातील अशी आम्हाला भीती आहे. पोलिसांना नक्की काय करायचे आहे?’, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘नीट’ पेपर लीक आणि स्पर्धा परीक्षांमधील इतर घोळांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ‘सीजेपी’ गेल्या २० जूनपासून जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'यूपीआय'ला AI चे बळ मिळणार; रोज १०० कोटी व्यवहाराचे लक्ष्य; एनपीसीआयचे सीईओ दिलीप आसबे यांची माहिती

ठाणे-पालघर जिल्हा बँकेत सहकार पॅनलची एकहाती सत्ता; २१ पैकी १५ जागांवर विजय संपादन; परिवर्तन पॅनलचा पराभव

मध्य रेल्वेच्या भाडे व्यतिरिक्त महसुलात १६ टक्क्यांची वाढ; मे अखेर २०.४८ कोटींची कमाई; विविध व्यावसायिक उपक्रमांतून वाढले उत्पन्न

मुरूडच्या मच्छिमारांसाठी 'रापण' उदरनिर्वाहाचे वरदान; पावसाळ्यात पारंपरिक मासेमारीला प्राधान्य; फीलसा माशाला बाजारात चांगला दर

प्रत्येक वॉर्डात नियुक्त होणार 'पेशंट नेव्हिगेटर'; कर्करोग रुग्णांसाठी BMC ची नवी यंत्रणा; २४ आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण