सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र 'हार्परकॉलिन्स'मार्फत संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र 'हार्परकॉलिन्स'मार्फत

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित 'बिलॉंगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राच्या भारतातील प्रकाशनाबाबत असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया'सोबत झालेल्या वादामुळे निर्माण झालेली कोंडी फुटली असून, आता 'हार्परकॉलिन्स इंडिया' हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी भारतामध्ये प्रकाशित करणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित 'बिलॉंगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राच्या भारतातील प्रकाशनाबाबत असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया'सोबत झालेल्या वादामुळे निर्माण झालेली कोंडी फुटली असून, आता 'हार्परकॉलिन्स इंडिया' हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी भारतामध्ये प्रकाशित करणार आहे.

हार्परकॉलिन्स इंडियाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आजच्या काळातील अत्यंत उत्सुकता असलेल्या राजकीय आत्मचरित्रांपैकी हे एक आहे. 'बिलाँगिंग' ही प्रेम, ओळख, कर्तव्य आणि आपुलकीची एक नाट्यमय तसेच अत्यंत वैयक्तिक कहाणी असून, त्यातून भारताच्या प्रवासाचा दुर्मिळ अंतर्गत दृष्टिकोन पाहायला मिळतो.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इटलीतील व्हेनेटो येथील बालपणापासून केंब्रिजमधील प्रवासाचा यात उल्लेख आहे, जेथे १९६५ मध्ये त्यांची भेट राजीव गांधी यांच्याशी झाली. राजीव गांधी यांच्याशी विवाह, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट आणि भारतात आल्यानंतर हिंदी शिकणे, साडी नेसणे व भारतीय संस्कृतीशी जुळवून घेणे याचा प्रवास यात मांडला आहे.

संजय गांधी यांचा विमान अपघात, १९८४ मधील इंदिरा गांधींची हत्या आणि १९९१ मधील राजीव गांधी यांची हत्या या दुःखद घटनांचे चित्रण, २००४ मधील काँग्रेसच्या विजयानंतर पंतप्रधानपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि पुढील १० वर्षे आघाडी सरकारचे केलेले नेतृत्व यावरही यात भाष्य करण्यात आले आहे.

दबावामुळे माघार?

यापूर्वी 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया' हे पुस्तक प्रकाशित करणार होते; परंतु हस्तलिखितातील काही संपादकीय बदलांवरून लेखक आणि प्रकाशकांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर पेंग्विनने या पुस्तकाच्या भारतीय प्रकाशनातून माघार घेतली. यावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारच्या काळातील चीनच्या आक्रमणाशी संबंधित भाग हटवण्यासाठी प्रकाशकावर सरकारी दबाव आणला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता.

दबाव नाही

'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया'ने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले की, आमच्यावर कोणताही बाह्य दबाव नव्हता. आम्ही हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी उत्सुक होतो, परंतु एका विशिष्ट मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही. आता हार्परकॉलिन्स इंडिया हे पुस्तक भारतात प्रकाशित करत असल्याने, आंतरराष्ट्रीय प्रकाशनासोबतच (अल्फ्रेड ए. नॉफ/पेंग्विन रँडम हाऊसद्वारे) १० नोव्हेंबरला हे पुस्तक भारतीय वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

१० थरांसाठी गोविंदांची चुरस! मुंबई, ठाण्यातील दहीहंडीकडेही लक्ष

Maratha Reservation : उपोषण मागे घेण्यास मनोज जरांगेंचा नकार

लाडक्या बाप्पाचे पूजासाहित्य महागले; मुंबईसह कोकणात जाणाऱ्या भक्तांची खरेदीसाठी उडाली झुंबड; कापूर, धूप, अगरबत्ती, कंठीच्या दरात झाली १० ते १५ टक्क्यांची वाढ

Mumbai : दहीहंडीसाठी रुग्णालये अ‍ॅलर्ट; जखमी गोविंदांना मिळणार तत्काळ उपचार

मुंबईत ऑगस्टमध्ये ६६ टक्के कमी पाऊस; ३५ वर्षांतील नीचांक