सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचे १० नोव्हेंबरला प्रकाशन (Photo-X)
राष्ट्रीय

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचे १० नोव्हेंबरला प्रकाशन

काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. "बिलॉँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह" असे या पुस्तकाचे नाव असून, हे आत्मचरित्र येत्या १० नोव्हेंबरला प्रकाशित होणार असल्याची माहिती 'अल्फ्रेड ए. क्नोफ' या प्रकाशन संस्थेने दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली/न्यू यॉर्क : काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. "बिलॉँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह" असे या पुस्तकाचे नाव असून, हे आत्मचरित्र येत्या १० नोव्हेंबरला प्रकाशित होणार असल्याची माहिती 'अल्फ्रेड ए. क्नोफ' या प्रकाशन संस्थेने दिली आहे. या आत्मचरित्रात सोनिया गांधी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेम, दुःखद वियोग आणि २००४ मध्ये भारताच्या पंतप्रधानपदाची ऑफर नाकारण्यामागचा ऐतिहासिक निर्णय यावर मोकळेपणाने भाष्य केले आहे.

आत्मचरित्रातील मुद्दे

आपल्या पुस्तकाबद्दल सोनिया गांधी म्हणाल्या, माझ्या कुटुंबाबद्दल आजवर बरेच लिहिले गेले आहे, पण त्यांच्या भावना, निर्णय आणि मानवी चुकांचा खरा गाभा फार कमी लिखाणातून समोर आला. हे पुस्तक एका अर्थाने त्यांच्यातील 'माणुसकीला' वाहिलेली आदरांजली आहे. गेल्या सहा दशकांत मी जवळून पाहिलेल्या सामाजिक आणि राजकीय बदलांचा एक वेगळा दृष्टिकोन या पुस्तकातून वाचकांना मिळेल.

इटली ते भारत प्रवास

१९६० च्या दशकात केंब्रिजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची भेट राजीव गांधी यांच्याशी झाली. इटलीतील एका छोट्या शहरातून सुरू झालेला हा प्रवास भारताच्या अत्यंत प्रभावी राजकीय घराण्याची सून आणि पुढे काँग्रेसची अध्यक्ष होण्यापर्यंत कसा बदलत गेला, याचे पदर या पुस्तकात उलगडण्यात आले आहेत.

अश्रू आणि राजकारणातील प्रवेश

१९८४ मध्ये सासू आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झालेली हत्या, आणि त्यानंतर १९९१ मध्ये पती राजीव गांधी यांची झालेली निर्घृण हत्या यामुळे सोनिया गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्याला मोठा धक्का बसला. "हृदयभंग आणि वैयक्तिक हानीमुळेच मला राजकारणाच्या सार्वजनिक प्रवाहात यावे लागले, तोपर्यंत मी माझे खासगीपण जपत होते," असे त्यांनी नमूद केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाहनचालकांच्या मराठी ज्ञानाची होणार तपासणी; आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

Navi Mumbai : 'तू माझा खरा पप्पा नाहीस!' चिमुकल्याच्या बोलण्याने सावत्र पित्याचे पित्त खवळले; चिमुरड्याची केली निर्घृण हत्या

पुण्यात मुलाचा अपघाती मृत्यू; खड्डयामुळे दुचाकीवरून पडून घडली दुर्घटना, Video

Mumbai : विसर्जन स्थळी समुद्रात ‘सेफ्टी सिग्नल’; खोलवर जाणाऱ्या भाविकांना ओहोटी रेषा दर्शवणारी तरंगती चिन्हे

राहुल नार्वेकर यांचे सर्वच निर्णय चुकले - कपिल सिब्बल