सोनिया गांधी यांचे नागरिकत्व : पोलिसांचा कोर्टात अहवाल संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

सोनिया गांधी यांचे नागरिकत्व : पोलिसांचा कोर्टात अहवाल

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वी तीन वर्षे म्हणजे १९८० मध्ये मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याच्या तक्रारीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी न्यायालयात दोन अहवाल सादर केले.

Swapnil S

नवी दिल्ली: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वी तीन वर्षे म्हणजे १९८० मध्ये मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याच्या तक्रारीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी न्यायालयात दोन अहवाल सादर केले.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) विनोद जोशी यांनी यापूर्वी पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला होता. २७ नोव्हेंबरच्या अहवालानुसार, तक्रारीतील आरोप हे आयपी इस्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने तक्रार आवश्यक कारवाईसाठी नवी दिल्ली जिल्ह्याकडे वर्ग करण्यात आली.

शनिवारी पोलिसांनी तक्रार तुघलक रोड पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर तुघलक रोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दुसरा अहवाल सादर केला. त्यात १९८० आणि १९८३ मधील सोनिया गांधी यांच्या मतदार यादीतील नोंदींबाबत नवी दिल्ली जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती मागवण्यात आली होती. त्यावर त्यांच्या नावाची मतदार यादीत नोंद असल्याचे पुष्टी करण्यात आली.

मात्र, त्यासंबंधीचे फॉर्म ६ आणि अन्य कागदपत्रे अद्याप उपलब्ध नसून त्यांचा शोध सुरू असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परदेशी नागरिक विभागाकडे सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व कधी देण्यात आले, याबाबत माहिती मागवण्यात आली होती. ३० एप्रिल १९८३ रोजी अँटोनिया मायनो ऊर्फ सोनिया गांधी यांना नागरिकत्व प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध

महिला विधेयक कोणीही रोखू शकत नाही - पंतप्रधान मोदी

८५० चा आकडा म्हणजे लोकशाहीची हत्या - राहुल गांधी

Mumbai : पालिकेच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी सल्लागारांची फौज; पुनर्बांधणी, ऑडिटसाठी ८५ सल्लागारांची नियुक्ती

आजचे राशिभविष्य, २९ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत