राष्ट्रीय

सोनियांसह १४ जणांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी नव्या संसद भवनात सदस्यांना शपथ दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह १४ जणांनी गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी नव्या संसद भवनात सदस्यांना शपथ दिली.

काँग्रेसचे नेते अजय माकन आणि सय्यद नासीर हुसेन, भाजप नेते आरपीएन सिंह, सामिक भट्टाचार्य, जदयूचे संजयकुमार झा, बीजेडीचे शुभाषिश खुंटिया आणि देबशिष सामंतराय, भाजपचे मदन राठोड यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. वायएसआरसीपीचे नेते गोल्ला बाबूराव, मेदा रघुनाथ रेड्डी आणि येरम वेंकट सुब्बा रेड्डी. बीआरएस नेते रवीचंद्र वडिराजू यांनीही सदस्यत्वाची शपथ घेतली.

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

निवासी जागा : व्यावसायिक वापर केल्यास जागा सील; सुप्रीम कोर्टाचे आदेश

बाप्पा...पुढच्या वर्षी लवकर या! १२ दिवसांच्या ३६ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन; गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजराने मुंबई दुमदुमली