राष्ट्रीय

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना मंगळवारी रात्री सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना मंगळवारी रात्री सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयाचे चेअरमन डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेवून आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पोटातील संसर्ग आणि मूत्रमार्गातील संसर्गाबाबत काही चाचण्या केल्या जात आहेत. उपचाराचा भाग म्हणून त्यांना प्रतिजैविके देण्यात आली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदलामुळे सोनिया गांधी यांना अस्वस्थ वाटू लागले होते, त्यामुळे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्यासारखे कोणतेही गंभीर कारण नसल्याचेही रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण