राष्ट्रीय

स्क्वाड्रन लीडर रश्मी ठाकूर करणार हवाई दलाच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व

Swapnil S

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्यपथावर स्क्वाड्रन लीडर रश्मी ठाकूर या भारतीय वायुसेनेच्या संचलन दलाचे नेतृत्व करणार आहेत. त्याशिवाय हवाई दलाच्या १५ महिला वैमानिक देखील एरियल फ्लाय पास्ट दरम्यान विविध प्लॅटफॉर्मवर काम करतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हवाई दलाच्या संचलन करणाऱ्या तुकडीचे नेतृत्व ठाकूर करतील, तर त्यांच्या नेतृत्वाखाली स्क्वाड्रन लीडर सुमिता यादव, स्क्वाड्रन लीडर प्रीती अहलुवालिया आणि फ्लाइट लेफ्टनंट कीर्ती रोहिल हे सुपरन्युमररी अधिकारी म्हणून काम करतील. स्क्वाड्रन लीडर ठाकूर या फायटर कंट्रोलर आहेत. भारतीय हवाई दलाच्या संचलन करणाऱ्या तुकडी व्यतिरिक्त अग्निवीर वायूचे (महिला) त्रि-सेवा दल परेडमध्ये सहभागी होणार आहे. एकूण ४८ अग्निवीर वायू महिला या तुकडीचा भाग असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फ्लाइट लेफ्टनंट सृष्टी वर्मा या त्रि-सेवेच्या तुकडीच्या सुपरन्युमररी ऑफिसर म्हणून कूच करणार आहेत. IAF हवाई दलाच्या प्रजासत्ताक दिनाच्या झलकची थीम 'भारतीय वायुसेना: सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर' असेल. फ्लाइट लेफ्टनंट अनन्या शर्मा आणि फ्लाइंग ऑफिसर अस्मा शेख या दोन्ही एसयू-३० पायलट उपस्थित असतील.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस