राष्ट्रीय

श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे ; १३४ मतांनी झाला विजय

२२५ सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती.

वृत्तसंस्था

श्रीलंकेमध्ये बुधवारी नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे निवडून आले आहेत. मागील ४४ वर्षांत प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक रिंगणात होते. २२५ सदस्य असणाऱ्या श्रीलंकेच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती. रानिल विक्रमसिंघे यांना स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांना १३४ मते मिळाली आहेत.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाय राजपक्षे यांनी १४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता. राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर १४ जुलै रोजी ते सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांच्याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला होता. परिणामी, राजपक्षे यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली. यानंतर आता गोताबाय यांच्या जागी नवीन राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत.

आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसमोर कर्जाचा डोंगर असून यासंदर्भात नवीन राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या देशातील दोन कोटी २० लाख लोक इंधन, गॅस, दुधाची पावडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड देत आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश