राष्ट्रीय

देशाच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर; स्टेट बँकेच्या अहवालातील माहिती

कोव्हिड-१९ साथीपूर्वी देशाच्या विकासाचा (जीडीपी) दर ५.७ टक्के होता. आता तो ८.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे योगदान सर्वांत मोठे आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कोव्हिड-१९ साथीनंतरच्या काळात देशाच्या विकासात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर असल्याचे निरीक्षण स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) त्यांच्या ताज्या अहवालात नोंदवले आहे.

कोव्हिड-१९ साथीपूर्वी देशाच्या विकासाचा (जीडीपी) दर ५.७ टक्के होता. आता तो ८.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे योगदान सर्वांत मोठे आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश, ओदिशा, तेलंगण, सिक्कीम आणि मध्य प्रदेश ही राज्ये लक्षणीय आर्थिक गती आणि विकास दर्शवितात.

दरडोई उत्पन्नात गुजरात आघाडीवर

अहवालात अनेक राज्यांमधील दरडोई उत्पन्नातील वाढदेखील अधोरेखित केली आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजे १.९ पटींने वाढ दिसून आली आहे. गुजरात, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांनी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत इतर राज्यांना मागे टाकले आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि मध्य प्रदेश यांसारख्या काही राज्यांनी दरडोई उत्पन्न वाढीचा वेग स्थिर ठेवला आहे, तर झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी दरडोई उत्पन्न वाढीमध्ये घसरण अनुभवली आहे.

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम