राष्ट्रीय

राजस्थानमध्ये जन आशिर्वाद यात्रेवर दगडफेक

नवशक्ती Web Desk

भोपाळ: मध्य प्रदेशमधील नीमच शहरात मंगळवारी सायंकाळी भाजपाची जन आशिर्वाद यात्रा काढण्यात आली होती. तेव्हा या यात्रेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत भाजपाच्या रथासह अनेक गाड्यांचे नुकसान झाले. या हल्ल्यातून पोलीसांच्या गाड्यादेखील सुटल्या नाहीत. हल्या प्रसंगी भाजपचे अनेक नेते तेथे उपस्थित होते. भाजपने या हल्यास कॉंग्रेस पक्षाला जबाबदार धरले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा यांनी भाजपच्या यात्रेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र अशा भ्याड हल्यांना आम्ही घाबरणार नाही. गरज पडल्या आम्ही पायी चालू. आमच्यावरील हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित होता व हा कॉंग्रेस पक्षाचा कट होता असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी उज्जैन येथे जन आशिर्वाद यात्रेची सुरुवात केली हेाती. त्यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा उपस्थित होते. नीमच येथे देखील राजनाथ सिंह यांची सभा झाली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस