राष्ट्रीय

अशा मित्रापेक्षा...! पेट्रोल भरताना सिगारेट ओढू नको म्हटल्याचा राग; बाईकच्या टाकीजवळ पेटवलं लायटर अन्...थरारक Video, दोघांना अटक

पेट्रोल पंपावर घडलेली ही घटना बघून ‘अशा मित्रापेक्षा दुश्मन बरा’ असंच म्हणावं लागेल. दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना सिगारेट ओढू नको असे मित्राने सांगितल्याच्या रागातून तरुणाने थेट बाईकच्या पेट्रोल टाकीजवळ लायटर पेटवून आग लावली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Krantee V. Kale

पेट्रोल पंपावर घडलेली ही घटना बघून ‘अशा मित्रापेक्षा दुश्मन बरा’ असंच म्हणावं लागेल. छत्तीसगडच्या रायपूरमधील बिरगाव परिसरात पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना सिगारेट ओढू नको असे मित्राने सांगितल्याच्या रागातून तरुणाने थेट बाईकच्या पेट्रोल टाकीजवळ लायटर पेटवून आग लावली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ही घटना १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता उरला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर घडली. माहितीनुसार, दोन तरुण (धर्मेंद्र क्षत्री आणि इम्रान) मोटारसायकलवर पेट्रोल भरण्यासाठी आले होते.

नेमकं काय घडलं?

पेट्रोल पंपावरील कर्मचारी बाईकमध्ये पेट्रोल भरत असताना इम्रान बाईकवर बसला होता, तर धर्मेंद्र बाजूला उभा राहून सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न करत होता. ते बघून इम्रानने धर्मेंद्रला सिगारेट ओढण्यापासून रोखले आणि दूर केले. याचा राग आल्याने धर्मेंद्रने थेट लायटर पेट्रोलच्या टाकीजवळ नेलं अन् क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला. घाबरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यासह दोघेही बाजूला पळून गेले. पंपावर एकच खळबळ उडाली.

कर्मचाऱ्यांची तत्परता; मोठा अनर्थ टळला

तथापि, पेट्रोल पंपावरील अन्य एका कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत तत्काळ अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग विझवली. त्यामुळे भूमिगत इंधन साठ्यांपर्यंत आग पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. थोडा वेळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे मालमत्तेचे नुकसान झाले नाही. घटनेनंतर, दोघेही पळून जाण्याच्या प्रयत्नात होते परंतु पंप कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. पंप व्यवस्थापकाने तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नंतर दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांवर जाळपोळ आणि सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मद्यपान केले होते असेही सांगितले जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सौर कृषिपंपांमध्ये राज्याचा विक्रम; देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा वाटा ६४ टक्के

Thane : पालकांनी मुदतीत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन; RTE प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी ४ ते १२ जूनदरम्यान

ऑफिसमध्ये २५-३० वार करत एक्स गर्लफ्रेंडची हत्या; आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही फिरवला चाकू, धक्कादायक VIDEO व्हायरल

मुंबईतील विहिरींना पावसाची ओढ; एक हजार विहिरींची युद्धपातळीवर साफसफाई, पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी उपलब्ध करणार

मुंबईला मिळणार पहिला ‘पादचारी झोन’; काळा घोडा परिसर पर्यटकांचे ठरणार आकर्षण