ANI
राष्ट्रीय

‘एनटीए’च्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; ‘नीट’मधील प्रकार; केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा इशारा

यंदाच्या ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकाराबाबत राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (एनटीए) अधिकारी दोषी ठरल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : यंदाच्या ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकाराबाबत राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (एनटीए) अधिकारी दोषी ठरल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, ‘नीट’ परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘एनटीए’ या संस्थेच्या कामकाजात सुधारणा गरजेच्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, १५६३ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल. या प्रकरणाकडे सरकार गंभीरतेने पाहत आहे, असे मी विद्यार्थी व पालकांना आश्वासन देऊ इच्छितो, असे त्यांनी स्पष्ट केले.

या परीक्षेतील गैरप्रकारात ‘एनटीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याचे दिसल्यास त्यांना कडक शिक्षा केली जाईल.

सुप्रीम कोर्टाच्या अधिपत्याखाली चौकशी व्हावी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ‘नीट’मधील गैरप्रकाराबाबत झालेल्या आरोपांची सुप्रीम कोर्टाच्या अधिपत्याखाली चौकशी व्हावी, अशी मागणी केली. परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतीबाबत सर्व राज्यांसोबत विचार केला पाहिजे. कोणत्याही परीक्षेत परीक्षेच्या तंत्रावर भ्रष्टतेचा आरोप होत असल्यास पंतप्रधानांनी गप्प बसणे योग्य नाही, असा टोलाही सिब्बल यांनी लगावला. येत्या संसद अधिवेशनात सर्व राजकीय पक्षांनी ‘नीट’ गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित करावा. या प्रकरणी चर्चा होईल असे सांगता येत नाही. कारण हे प्रकरण न्यायालयात असल्याचे कारण देऊन सरकार त्याला परवानगी देणार नाही, असेही ते म्हणाले.

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

अर्बन कंपनी, बोट ब्रँडच्या मूळ कंपनीला IPO लाँच करण्यासाठी सेबीची परवानगी; १३ कंपन्या एकत्रितपणे १५,००० कोटी उभारणार

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी