राष्ट्रीय

सर्वोच्च न्यायालयाचा दणका! चंदीगडच्या महापौरपदी आम आदमी पक्षाचा नगरसेवक

चंदीगडच्या महपौरपदावर आपचा उमेदवार घोषित करण्यात आला असून आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांचा विजय झाला आहे.

Naresh Shende

चंदीगडमध्ये ३० जानेवारीला झालेल्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत फसवणूक झाल्याचं उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला होता. त्यावेळी झालेल्या मतमोजणीत आम आदमी पार्टीची ८ मते अवैध ठरवण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यालायाने आज मंगळवारी दिलेल्या निकालानंतर ही मते वैध ठरवण्यात आली आहेत. त्यामुळे चंदीगडच्या महपौरपदावर आपचा उमेदवार घोषित करण्यात आला असून नगरसेवक कुलदीप कुमार यांचा विजय झाला आहे.

निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकीबाबत सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी चंदीगडच्या महापौरपदासाठी पुन्हा निवडणूक घेऊ नका. मतपत्रिकांच्या आधारावर निकाल जाहीर केला जाईल, असं न्यायालयाने म्हटलं होतं.

चंदीगड महापौरपदासाठी ३० जानेवारीला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत झालेला गैरप्रकार उघडकीस आला. या गंभीर घटनेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. ३० जानेवारीला झालेल्या मतदानाची व्हिडीओ क्लिप आणि मतपत्रिकांची छाननी आज मंगळवारी करण्यात आलीय. त्यामुळे ही मतमोजणी पुन्हा केल्यावर आपची ८ मते वैध ठरली असून नगरसेवक कुलदीप कुमार विजयी झाले आहेत.

चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे निवडणुकीत इंडिया आघाडीतील पक्षांचा पराभव झाला होता. निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला होता. याप्रकरणी आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात नवीन मतमोजणीची मागणी केली होती. त्यानुसार आज पुन्हा मतमोजणी झाल्यावर आम आदमी पक्षाचे ८ मते वैध ठरली आणि भाजपचा पराभव झाला.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत