संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

...तर ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु’ हा श्लोक निरर्थक; सुप्रीम कोर्टाचे गुजरात सरकारवर ताशेरे

शिक्षकांना सन्मानजनक वेतनही मिळत नसेल तर ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु’ हा श्लोक निरर्थक आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविताना गुजरात सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देशातील शिक्षकांच्या वेतनावर, त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठी टिप्पणी केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : शिक्षकांना सन्मानजनक वेतनही मिळत नसेल तर ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु’ हा श्लोक निरर्थक आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविताना गुजरात सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देशातील शिक्षकांच्या वेतनावर, त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठी टिप्पणी केली आहे.

गुजरात सरकारबाबत नाराजी व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना वेतन म्हणून अवघे ३० हजार रुपये दिले जातात, तर नियमित सहाय्यक प्राध्यापकांना १.२ ते १.४ लाख रुपये इतका पगार दिला जातो. ही तफावत चिंताजनक आहे. न्या. पी. एस. नरसिम्हा व न्या. जे.बागची यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, जे शिक्षक आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांचे भविष्य घडवतात त्यांना उचित वागणूक मिळत नाही.

जे शिक्षक आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांचे भविष्य घडवतात, आपल्या मुलांना येणाऱ्या काळासाठी तयार करतात, त्यांना अशी वागणूक देता येणार नाही. शिक्षक हे कुठल्याही देशाचा कणा असतात. कारण तेच आपल्या मुलांना भविष्यातील आव्हानांसाठी, चांगले जीवन जगण्यासाठी तयार करतात. शिक्षक समाजाला संशोधन, विचार व मूल्यांच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग दाखवतात, असे खंडपीठाने म्हटले आहे.

समाजाला शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची ओळख पटवून दिली जात नाही, ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

न्यायमूर्ती म्हणाले, शिक्षकांना सन्मानजनक वेतनच मिळाले नाही तर देशात ज्ञान व बौद्धिक प्रगतीला योग्य स्थान मिळणार नाही. यापूर्वी उच्च न्यायालयाने याच प्रकरणात दिलेल्या निकालात गुजरात सरकारला निर्देश दिले होते की, या प्रकरणात ‘समान कार्य, समान वेतन’ या तत्वाचे पालन करायला हवे.

पगार ही चिंतेची बाब

सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी टिप्पणी केली आहे की, गेल्या दोन दशकांपासून सहाय्यक प्राध्यापकांना इतका कमी पगार दिला जात आहे ही खूपच चिंतेची बाब आहे. आमच्यासमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार २,७२० रिक्त पदांपैकी केवळ ९२३ पदांवरच कायमस्वरुपी भरती करण्यात आली आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाच्या कार्यात अडथळे येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार १५८ अस्थायी व ९०२ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे. तर, ७३७ पदे अजूनही रिक्त आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतानाही केवळ कंत्राटी व अस्थायी पद्धतीनेच शिक्षकांना कामावर ठेवले जात आहे. यामुळे अध्यापन कार्यात अडथळे येत आहेत.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले