राष्ट्रीय

भोजशाळेत नमाजासाठी जागा देण्याचा हंगामी आदेश

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा प्रकरणावर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. शुक्रवारच्या नमाजासाठी मुस्लिम बांधवांना भोजशाळा परिसराला लागूनच एक स्वतंत्र मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा प्रकरणावर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. शुक्रवारच्या नमाजासाठी मुस्लिम बांधवांना भोजशाळा परिसराला लागूनच एक स्वतंत्र मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले आहेत. शुक्रवारी दुपारी १ ते ३ या वेळेत मुस्लिमांना या जागेवर नमाज पठण करता येईल.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या.जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले की, ही व्यवस्था पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून, या प्रकरणातील अंतिम निकालावर ती अवलंबून असेल. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागालाही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या परवानगीशिवाय भोजशाळेच्या मूळ संरचनेत किंवा इमारतीत कोणत्याही प्रकारचे बदल केले जाऊ नयेत, असे न्यायालयाने बजावले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'