संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

सीमेवर भिंत बांधायची आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला प्रश्न

बेकायदेशीर स्थलांतरितांचा देशात प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेसारखी सीमेवर भिंत उभारण्याचा त्यांचा विचार आहे का?, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला विचारला.

Swapnil S

नवी दिल्ली : बेकायदेशीर स्थलांतरितांचा देशात प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेसारखी सीमेवर भिंत उभारण्याचा त्यांचा विचार आहे का?, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला विचारला.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत, न्या. जयमाला बागची आणि न्या. विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने केंद्राला विशेषतः बांगलादेशात बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवताना कोणती "मानक कार्यपद्धती" अवलंबली जाते, हे स्पष्ट करण्यास सांगितले. तसेच या प्रकरणात गुजरात सरकारलाही पक्षकार करण्यात आले.

केंद्राची बाजू मांडताना महाधिवक्ता तुषार मेहता यांनी पश्चिम बंगाल स्थलांतरित कल्याण मंडळाने दाखल केलेल्या याचिकेला आक्षेप घेतला. या याचिकेत बंगाली भाषक स्थलांतरित कामगारांना बांगलादेशी म्हणून संशयावरून स्थलांतरित केंद्रावर ठेवले जात असल्याचा आरोप आहे.

मेहता म्हणाले, कोणतीही पीडित "प्रत्यक्षात व्यक्ती न्यायालयात हजर नाही. काही राज्य सरकारे बेकायदेशीर स्थलांतरितांवर राजकारण करतात. लोकसंख्येतील बदल गंभीर प्रश्न बनले आहेत."

खंडपीठाने मेहतांना उद्देशून म्हटले की, कदाचित पीडित लोकांकडे संसाधनांचा अभाव असल्याने ते थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचू शकले नाहीत.

याचिकाकर्त्यांचे वकील वकील प्रशांत भूषण यांच्या संदर्भात मेहता म्हणाले की असे "सार्वजनिक हिताचे कार्यकर्ते" त्यांना न्यायालयात आणण्यास मदत करावी, जशी ते अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतराच्या मुद्द्यावर लोकांना मदत करतात.

न्या. बागची यांनी त्यानंतर मेहतांना विचारले, "बेकायदेशीर स्थलांतरिताना भारतात रोखण्यासाठी शिरण्यापासून तुम्हाला अमेरिकेसारखी भिंत उभारायची आहे का?"

त्यावर मेहता म्हणाले, "नक्कीच नाही, परंतु कोणतीही वैयक्तिक तक्रार नाही. केंद्र सरकारकडून या अस्पष्ट आरोपांना कसा प्रतिसाद द्यायचा? जर कोणी प्रत्यक्ष येऊन सांगितले की मला बाहेर हाकलले जात आहे, तर आम्ही उत्तर देऊ शकतो. फक्त मीडिया रिपोर्ट्सवर आधार घेता येत नाही. काही एजंट्स आहेत जे बेकायदेशीर प्रवेशास मदत करतात."

न्या. बागची यांनी प्रत्युत्तर दिले, "राष्ट्रीय सुरक्षेचे, राष्ट्राच्या अखंडतेचे आणि संसाधनांच्या जतनाचे प्रश्न आहेत, परंतु त्याचवेळी आपला सामायिक वारसा आहे.

बंगाली भाषिकांना बांगलादेशात ढकलले जाते

भूषण यांनी आरोप केला की, बंगाली भाषिकांना उचलून जबरदस्तीने बांगलादेशात ढकलले जात आहे. "काही वेळा सीमा सुरक्षा दल म्हणते पळून जा नाहीतर गोळी घालू. तसेच बांगलादेश बॉर्डर गार्ड्स म्हणतात की दुसऱ्या बाजूला जा नाहीतर आम्ही गोळी घालू," असे ते म्हणाले.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती