राजेश खन्नासोबतच्या नात्याला वैवाहिक मान्यता; अनिता अडवाणींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली  
राष्ट्रीय

राजेश खन्नासोबतच्या नात्याला वैवाहिक मान्यता; अनिता अडवाणींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतच्या आपल्या नात्याला वैवाहिक मान्यता मिळावी, यासाठी माजी अभिनेत्री अनिता अडवाणी यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतच्या आपल्या नात्याला वैवाहिक मान्यता मिळावी, यासाठी माजी अभिनेत्री अनिता अडवाणी यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेला 'विलासी खटला' (लक्झरी लिटिगेशन) असे म्हटले आहे.

न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. प्रसन्ना बी. वराळे यांच्या बेंचने ही याचिका फेटाळताना सांगितले की, ही याचिका दाखल करण्यासाठी कोणतेही ठोस कारण किंवा आधार नाही. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने १ एप्रिल रोजी अनिता अडवाणी यांची याचिका फेटाळली होती, ज्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिता अडवाणी यांच्यासाठी कायदेशीर लढा संपल्यातच जमा आहे. याप्रकरणी २०१३ मध्ये अडवाणी यांनी डिंपल कापडिया आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात देशाच्या घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत न्यायालयात धाव घेत दरमहा पोटगी आणि वांद्रे येथे ३ बीएचके फ्लॅटची मागणी केली होती.

मात्र, उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये हा खटला रद्दबातल ठरवला होता. उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, अडवाणी यांचे राजेश खन्ना यांच्यासोबतचे नाते हे विवाहाच्या स्वरूपातले नव्हते, त्यामुळे त्यांना या कायद्यांतर्गत दाद मागता येणार नाही.

प्रकरण काय आहे

अनिता अडवाणी यांचा दावा होता की, २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनापर्यंत त्या अनेक वर्षे त्यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्या होत्या. राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांची विभक्त पत्नी डिंपल कापडिया, मुलगी ट्विंकल खडक आणि जावई अक्षय कुमार यांनी त्यांना वांद्रे येथील 'आशीर्वाद' या बंगल्यातून बाहेर काढल्याचा आरोप त्यांनी केला होता.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महायुतीत ‘ब्लेम गेम’! शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळला नाही - भाजप; भाजपने आधी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे - शिंदेसेना

Thane : अखेर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; शिवसेना पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी पद सोडण्याचा निर्णय

२०१९ नंतर उद्धवजींनी मला बोलावलेच नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘इंडिया’ आघाडीच्या मार्चला CJP चा पाठिंबा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राहुल गांधींचे आ‌वाहन

मीरा-भाईंदर पालिकेत बूट खरेदी घोटाळा; १६० रुपयांचे बूट खरेदी केले ५०० रुपयांना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार