कांदा-लसूण तामस आहारात येतात का? याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याला फटकारले 
राष्ट्रीय

कांदा-लसूण तामस आहारात येतात का? याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याला फटकारले

लसूण आणि कांदा या बाबत संशोधन करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावताना सरन्यायाधीश सूर्य कान्त यांनी संबंधितांना चांगलेच फटकारले. तुम्ही अशा प्रकारच्या याचिका अर्ध्या रात्री तयार करता का, असा सवाल केला.

Swapnil S

नवी दिल्ली : लसूण आणि कांदा या बाबत संशोधन करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावताना सरन्यायाधीश सूर्य कान्त यांनी संबंधितांना चांगलेच फटकारले. तुम्ही अशा प्रकारच्या याचिका अर्ध्या रात्री तयार करता का, असा सवाल केला.

कांदा आणि लसूण तामस आहारामध्ये मोडतात का, त्यामध्ये नकारात्मक तत्त्वे असतात का, अशी विचारणा करणारी ही याचिका होती आणि यामध्ये संशोधन केले जावे अशी मागणी करण्यात आली होती ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

जैन समाज कांदा आणि लसूण खात नाही, त्याचप्रमाणे मूळं अशलेल्या भाज्यांचे सेवनही करीत नाहीत कारण या गोष्टी त्यांच्यासाठी तामस आहार आहेत, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. गुजरातमध्ये कांदा-लसूण असलेल्या जेवणामुळे घटस्फोटापर्यंत एक प्रकरण गेले होते, त्यामुळे हे घटक तामस आहेत का, या बाबत संशोधन केले जा‌वे, अशी मागणी करणारी याचिका फेटाळली आणि तुम्हाला जैन समाजाच्या भावना दुखवायच्या आहेत का, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने केला.

अशा प्रकारच्या तुच्छ याचिका आणाल तर त्या आम्ही फेटाळणारच, याचिकाकर्ते वकील आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळत आहोत, जर ते वकील नसते तर आम्ही ही याचिका दाखल केल्याबद्दल दंड ठाठावला असता. अशा प्रकारच्या याचिकांमुळे न्यायालयाचा वेळवाया जातो, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने या सोबतच अन्य तीन याचिकाही फेटाळल्या.

तंबाखू आणि मद्य यामधील हानिकारक घटक नियंत्रित करण्याची याचिका, मालमत्तांची नोंदणी अनिवार्य असण्याची अट निश्चित करण्याची मागणी करणारी याचिका आणि शास्त्रीय भाषांच्या घोषणांबाबतचे निर्देश तयार करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आल्या.

तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा आहेत? घरबसल्या ५ सोप्या पद्धतींनी तपासा बॅलन्स; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

Mumbai: अंधेरीत BEST बसचा भीषण अपघात! ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा; १४ वाहनांना धडक, VIDEO

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना धक्का; १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Lonavala-Karjat Landslide : मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम; १७ जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द, वाचा संपूर्ण यादी

Instagram Muse Image : तुमचं अकाउंट Public आहे? मग सावधान! मेटाचं AI फीचर वापरू शकतं तुमचे फोटो; 'असं' करा Opt Out