संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

राष्ट्रपती-राज्यपालांना डेडलाईन; सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या मंजुरीसाठी अंतिम मुदत मागणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पूर्ण केली. १० दिवसांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या मंजुरीसाठी अंतिम मुदत मागणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पूर्ण केली. १० दिवसांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

सुनावणीच्या शेवटच्या दिवशी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, न्यायालयाने हे स्पष्ट करावे की राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या मान्यतेसाठी अंतिम मुदत निश्चित करण्याचा २ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ८ एप्रिल रोजीचा निर्णय योग्य नाही. जर तो निर्णय योग्य मानला गेला, तर भविष्यात न्यायालयात मोठ्या प्रमाणात याचिका दाखल होतील आणि न्यायव्यवस्थेवरील भार वाढेल.

केंद्राच्या या युक्तिवादाला ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अरविंद दातार यांनी विरोध केला. त्यांनी म्हटले की, राष्ट्रपतींनी यासंदर्भात कोणताही प्रश्न विचारला नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर विचार करू नये.

Mumbai : उद्यापासून एलफिन्स्टन पूल बंद; दक्षिण मुंबईत होणार वाहतूककोंडी; अनेक मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल

लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का?भुजबळांचा उद्विग्न सवाल; लातूरच्या कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट, मुंडेही उपस्थित

नेपाळ : आंदोलकांनी आग लावलेल्या हॉटेलमधून पळण्याच्या प्रयत्नात भारतीय महिलेचा मृत्यू

Ulhasnagar : सेंच्युरी कंपनीच्या कँटीनमध्ये बनावट कूपन घोटाळा उघडकीस; प्रिंटिंग प्रेसवर पोलिसांची कारवाई

धुळ्यात माजी स्थायी सभापतीच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात उचललं टोकाचं पाऊल