राष्ट्रीय

भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाचा पुनर्विचार करू! सरन्यायाधीशांनी दिली लक्ष घालण्याची हमी

दिल्लीच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यावर देशभरातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरन्यायाधीश बी. आर गवई यांनी लक्ष घालण्याची हमी दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यावर देशभरातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरन्यायाधीश बी. आर गवई यांनी लक्ष घालण्याची हमी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या दिलेल्या आदेशावर आक्षेप घेत एका वकिलाने हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मांडले होते.

सदर बाब भटक्या कुत्र्यांशी संबंधित आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे ज्यामध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे की, कुत्र्यांना अशा प्रकारे हलवता येणार नाही. त्या निर्णयात न्या. करोल हेही सहभागी होते. त्या निर्णयात सर्व जीवांसाठी करुणा असली पाहिजे, असेही नमूद आहे, असे या वकिलाने म्हटले आहे.

यावर सरन्यायाधीश गवई म्हणाले, पण याप्रकरणी दुसऱ्या खंडपीठाने आधीच आदेश दिले आहेत. मी यामध्ये लक्ष घालेन. न्या. जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ११ ऑगस्ट रोजी दिल्ली सरकार, दिल्ली महानगरपालिका आणि नवी दिल्ली महानगरपालिका यांना दिल्लीच्या सर्व परिसरांमधून भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांना प्राण्यांच्या आश्रयस्थानात हलवण्याचे आदेश दिले होते.

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'