प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

भटक्या कुत्र्यांमुळे मृत्यू झाल्यास खायला घालणारे जबाबदार; सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा

भटक्या कुत्र्यांमुळे कुणी जखमी किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबरच खायला घालणाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा कडक इशारा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांमुळे कुणी जखमी किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबरच खायला घालणाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा कडक इशारा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

न्या. विक्रम नाथ, न्या. संदीप मेहता आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, गेल्या सुनावणीच्या वेळेस केलेल्या टिप्पणी मजेत घेऊ नका. आम्ही गंभीर असून न्यायालय जबाबदारी निश्चित करण्यापासून मागे हटणार नाही. कारण सध्याच्या व्यवस्थेत स्थानिक प्रशासनाचे अपयश समोर आले आहे. तसेच खासगी पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या विषयाची सुनावणी पूर्ण करू इच्छिते. त्यानंतर राज्यांना एक दिवसांची संधी देण्यात येईल.

या प्रकरणात व्यक्ती व स्वयंसेवी संस्थातर्फे सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी २८ जानेवारीला दुपारी २ वाजता घेण्यात येईल. याच दिवशी ॲॅमिकस क्युरी, मानवाधिकार आयोगाचे वकील, सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा युक्तिवाद ऐकण्यात येणार आहे.

न्या. नाथ यांनी ॲॅमिकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) यांना विचारले की, तुमची या विषयासंदर्भातील नोट तयार झाली का? त्यावरल ॲॅमिकस क्युरी (वकील गौरव अग्रवाल) म्हणाले की, अजून ७ राज्यांची माहिती येणे बाकी आहे.

न्यायालयाचा अवमान केल्याने मनेका गांधींवर कोर्ट नाराज

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांवर टीका केल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. खंडपीठाने सांगितले की, माजी मंत्री कोणताही विचार न करता ‘सर्वांवरच विविध प्रकारच्या टिप्पणी’ करत आहेत. मनेका गांधी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांना प्रश्न विचारताना खंडपीठ म्हणाले, ‘तुम्ही म्हणता की न्यायालयाने आपल्या टिप्पणींबाबत सावध राहावे; पण तुमच्या क्लाएंटने कोणत्या प्रकारच्या टिप्पणी केल्या आहेत, याबाबत तुम्ही त्यांना विचारले आहे का? तुम्ही त्यांचा पॉडकास्ट ऐकला आहे का? कोणताही विचार न करता त्या सर्वांवरच टिप्पणी करत आहेत. तुम्ही त्यांची देहबोली पाहिली आहे का?’, असे सवाल न्यायालयाने केले. मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्ही उदारतेपोटी माजी केंद्रीय मंत्र्यांविरोधात अवमान कारवाई सुरू करीत नाही.

न्या. मेहता यांनी रामचंद्रन यांना विचारले की, माजी केंद्रीय मंत्री म्हणून मेनका गांधी यांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी कोणती अर्थसंकल्पीय तरतूद मिळवून दिली आहे.

यावर रामचंद्रन यांनी उत्तर दिले की, त्यांनी दहशतवादी अजमल कसाब याच्यावतीनेही बाजू मांडली होती आणि अर्थसंकल्पीय तरतूद हा धोरणाचा विषय आहे. त्यावर न्या. नाथ म्हणाले, ‘अजमल कसाबने न्यायालयाचा अवमान केला नव्हता; पण तुमच्या क्लायंटने केला आहे.’

BMC महापौर निवडणूक ३१ जानेवारीला; २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात

मेट्रो लाइन '७ ए'ला मोठी चालना ; २४०० मिमी अपर वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम पूर्ण

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल