'राष्ट्रवादी'चे खासदार मोदींच्या भेटीला; १५ मिनिटे बैठक, महाराष्ट्राच्या प्रश्नांची चर्चा 
राष्ट्रीय

'राष्ट्रवादी'चे खासदार मोदींच्या भेटीला; १५ मिनिटे बैठक, महाराष्ट्राच्या प्रश्नांची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या १५ मिनिटांच्या भेटीत खासदारांनी महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर पंतप्रधानांशी चर्चा केली.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या १५ मिनिटांच्या भेटीत खासदारांनी महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर पंतप्रधानांशी चर्चा केली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्व आठही लोकसभा खासदार उपस्थित होते. भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही पंतप्रधानांसोबत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आहे. पक्षाच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले. यामध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थिती, कांद्याचे दर आणि चंद्रभागा नदीचे प्रदूषण यांसारख्या विविध गंभीर समस्यांचा समावेश होता.

दरम्यान, सध्या चर्चेत असलेल्या 'एफसीआरए' दुरुस्ती विधेयकाबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. सुप्रिया सुळे या सध्याच्या स्वरूपातील या विधेयकाला विरोध करत आहेत. परदेशी निधीकडे नेहमीच संशयाने पाहिले जाऊ शकत नाही, असे सांगत केंद्राने हे विधेयक एकतर मागे घ्यावे किंवा संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे, अशी मागणी त्यांनी शनिवारी केली होती.

'भारतरत्न' देण्याची मागणी

क्रान्तीज्योती सावित्रीबाई फुले, म. ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्रातील महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली आणि मोदी यांनी त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वाशन दिल्याचे समजते.

राष्ट्रवादी (शप गट) खासदारांची मोदींसोबतची भेट 'चांगली गोष्ट' - मुख्यमंत्री

विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाची सोमवारी नरेंद्र मोदी यांच्यासोबत ठरलेली भेट ही एक "चांगली गोष्ट" असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. मी ही एक मुख्यमंत्री आहे आणि विरोधी पक्षांचे अनेक नेते मला भेटायला येतात. ते मला त्यांच्या कामाबद्दल माहिती देतात. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचे कोणतेही कारण नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : 'सेंच्युरी' पुनर्विकास - १,३५१ कोटींची बोली; पेडर रियल्टी राबवणार प्रकल्प, ६५० कामगारांना मिळणार घरे

'भाषण नको, गोळीबाराचे आदेश कोणाचे हे सांगा'- राहुल गांधी

शांतपणे ऐकलेत तरच शहा उत्तर देतील; दिल्ली आंदोलनप्रकरणी विरोधकांना सरकारची अट

Mumbai : 'लोकल खाेळंब्या'ने हालच हाल! सोमवार ठरला 'त्रासवार',पश्चिमसह मध्य रेल्वेवरही तांत्रिक बिघाड

मोदी विरोधासाठी 'अल्गोरिदम'चा रडीचा डाव