Taj Mahal Survey : ताजमहालप्रकरणी प्रतिज्ञापत्राचे आदेश 
राष्ट्रीय

Taj Mahal Survey : ताजमहालप्रकरणी प्रतिज्ञापत्राचे आदेश

ताजमहालच्या आवारात अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजो महालय मंदिर असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

प्रयागराज : ताजमहालच्या आवारात अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजो महालय मंदिर असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी याप्रकरणी केंद्र सरकार आणि 'एएसआय'ला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले असून प्रतिवादी पंकज कुमार वर्मा यांनाही नोटीस बजावली आहे. आग्रा येथील जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हरी शंकर जैन आणि इतर चार जणांनी ३ जुलै रोजी ही याचिका दाखल केली होती.

आग्रा येथील दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात २०१५ पासून यासंदर्भातील एक खटला प्रलंबित असून, ताजमहालच्या आवारात तेजो महालय मंदिर असल्याचे घोषित करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. या प्रलंबित खटल्यादरम्यान वादग्रस्त परिसराचे सर्वेक्षण करण्यासाठी आणि छायाचित्रे काढण्यासाठी 'अॅडव्होकेट कमिशनर' नियुक्त करण्याची मागणी कनिष्ठ न्यायालयाने फेटाळली होती.

कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा असून प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वेक्षण आवश्यक असल्याचे याचिकाकर्ते हरी शंकर जैन यांनी उच्च न्यायालयात नमूद केले. त्यानंतर उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, 'एएसआय' आणि संबंधित पक्षांना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड