राष्ट्रीय

तेलगु देसम पार्टीची विधानसभा निवडणुकीतनू माघार

चंद्राबाबू नायडू सध्या आंध्रप्रदेश कौशल्य विकास मंडळातील घोटाळा प्रकरणी राज्याच्या केंद्रीय तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत

नवशक्ती Web Desk

हैदराबाद: तेलंगणातील तेलगू देशम पार्टी (टीडीपी) पक्षाने येत्या ३० नोव्हेंबर रोजी होणारी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती टीडीपी सूत्रांकडून देण्यात आली आहे. तेलंगणातील टीडीपी पक्षाचे अध्यक्ष कसानी गणेश्वर यांना ही माहिती देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी सर्वेसर्वा एन चंद्राबाबू नायडू यांची आंध्रप्रदेशातील राजामहेंद्रवरम तुरुंगात कसानी गनेश्वर यांनी भेट घेतली तेव्हा त्यांना ही माहिती देण्यात आली.

चंद्राबाबू नायडू सध्या आंध्रप्रदेश कौशल्य विकास मंडळातील घोटाळा प्रकरणी राज्याच्या केंद्रीय तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. कौशल्य विकास घोटाळ्यात सरकारी खजिन्यातील एकूण ३०० कोटींची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. २०१८ साली टीडीपी पक्षाला विधानसभा निवडणुकीत केवळ २ जागा जिंकता आल्या होत्या. या पक्षाला तेव्हा केवळ ३.५१ टक्केच मते मिळाली होती. टीडीपीने तेव्हा कॉंग्रेस बाणि सीपीआय पक्षांसोबत निवडणूकपूर्व युती केली होती. तरी देखील गणेश्वर यांनी यंदा निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती. आता मात्र त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. दरम्यान सिनेसृष्टीतून राजकारणात आलेले पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने आंध्रप्रदेशात टीडीपी सोबत युती केली होती. या पक्षाने मात्र ३२ जांगावर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. जनसेना हा पक्ष एनडीएचा घटक आहे.

'बिनविरोध' पॅटर्नवरून बोंबाबोंब; विरोधकांनी उठवला आवाज; राज ठाकरेंचे पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ'

मुंबई अधिक चांगली बनविण्यासाठी... द फ्री प्रेस जर्नल आयोजित चर्चेत रहिवाशांचा सहभाग

रेस्टॉरंट चालकांना न्यायालयाचा झटका; परवान्याशिवाय संगीत वाजवण्यास मनाई

तरुणाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी १.३० कोटी भरपाई द्या! उच्च न्यायालयाचा निर्णय; हेल्मेट नसूनही दावा मान्य

आम्ही आरोप केले तर अडचण होईल; रवींद्र चव्हाण यांचा अजित पवार यांना इशारा