Photo : X
राष्ट्रीय

दहशतवादी समंदर चाचा चकमकीत ठार

जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांच्या जगात 'ह्यूमन जीपीएस' म्हणून ओळखला जाणारा बागू खान उर्फ 'समंदर चाचा' मारला गेला आहे. समंदर चाचासह आणखी एक पाकिस्तानी घुसखोरही ठार झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Swapnil S

बंदिपोरा : जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांच्या जगात 'ह्यूमन जीपीएस' म्हणून ओळखला जाणारा बागू खान उर्फ 'समंदर चाचा' मारला गेला आहे. समंदर चाचासह आणखी एक पाकिस्तानी घुसखोरही ठार झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मार्गांची माहिती

बागू खान उर्फ समंदर चाचा १९९५ पासून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये राहत होता. सुरक्षा संस्थांच्या मते, गेल्या तीन दशकांपासून तो गुरेझ सेक्टर आणि आसपासच्या भागातून १०० हून अधिक घुसखोरीचे प्रयत्न करण्यात सहभागी होता, त्यापैकी बहुतेक यशस्वी झाले. त्याला या भागातील टेकड्या आणि गुप्त मार्गांची सखोल माहिती होती.

समंदर चाचा हिजबुल कमांडर होता, पण फक्त एका दहशतवादी संघटनेपुरता मर्यादित नव्हता. त्याने घुसखोरीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात जवळजवळ प्रत्येक दहशतवादी संघटनेला मदत केली. या कारणास्तव, दहशतवादी त्याला 'ह्यूमन जीपीएस' म्हणत असत.

चकमकीत ठार

नौशेरा नार परिसरातून तो २८ ऑगस्टच्या रात्री पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न करत होता, तेव्हा सुरक्षा दलांनी त्याला घेरले. समंदर चाचा आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक दहशतवादी चकमकीत ठार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत परिसरात गोळीबार आणि शोध मोहीम सुरू होती.

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, समंदर चाचाचा मृत्यू दहशतवादी संघटनांच्या लॉजिस्टिक्स नेटवर्कला मोठा धक्का आहे. त्याच्या हत्येने घुसखोरीच्या अनेक संभाव्य योजना उध्वस्त झाल्या आहेत.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश