Pinterest
राष्ट्रीय

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

जागतिक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्ला पुढील आठवड्यात मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे पहिले एक्सपिरियन्स सेंटर उघडून अधिकृतपणे भारतात प्रवेश करण्यास सज्ज आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जागतिक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्ला पुढील आठवड्यात मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे पहिले एक्सपिरियन्स सेंटर उघडून अधिकृतपणे भारतात प्रवेश करण्यास सज्ज आहे.

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील कंपनीने उद्घाटन कार्यक्रमाला भारतात टेस्लाचा लाँच म्हणून सादर करण्यासाठी निवडक निमंत्रणे पाठवली आहेत. टेस्लाशी प्रतिक्रयेसाठी संपर्क साधता आला नाही.

गेल्या महिन्यात, टेस्ला इंडियाने मुंबईतील लोढा लॉजिस्टिक्स पार्कमध्ये २४,५६५ चौरस फूट गोदाम जागा पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतली.

जूनमध्ये, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात कार तयार करण्यात रस घेत नाही. परंतु देशात शोरूम स्थापन करण्यास उत्सुक आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर टेस्लाने त्या देशाच्या शुल्कांना टाळण्यासाठी भारतात कारखाना सुरू केला, तर ते अमेरिकेसाठी अन्याय्यकारक ठरेल.

टेस्लाचे सीईओ अब्जाधीश इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये म्हटले होते की, कंपनीच्या मोठ्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचा भारत दौरा लांबला आहे.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास